top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 8
09-04-2023

शनिवारवाडा

मार्गदर्शन : प्रा.​ ​डॉ. गणेश राऊत 

शनिवारवाडा ही पुण्यातील एक महत्वाची हेरिटेज वास्तू आहे. १० जानेवारी १७३० रोजी वाड्याची पायाभरणी झाली. २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांत झाली. १७५० मध्ये आजची तटबंदी उभारली गेली. तटबंदी नव्हती तेव्हा वाड्याच्या रक्षणार्थ ४ जातिवंत कुत्री ठेवण्यात आली होती. थोरले बाजीराव पेशवे वाड्याचे निर्माते, त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे हे वाडयाचे विस्तारक, नानासाहेबांचे पुत्र थोरले माधवराव हे दौलतीचे खांब तोलून धरणारे पेशवे, त्यांचे धाकटे बंधू नारायणराव अल्पायुषी, त्यांचे पुत्र सवाई माधवराव जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पेशवेपद भूषविणारे एकमेव पेशवे आणि अखेरचे दुसरे बाजीराव पेशवे यांचा इतिहास या वेळी सांगण्यात येणार आहे.एकेकाळी अफगाणांना या देशाबाहेर घालविण्याचे प्रयत्न करणाऱ्या शूर वीरांची शौर्यकथा सांगितली जाणार आहे.


१८०८, १८१२, १८१३, १८२८ असा चार आगी लागून शनिवारवाडा भग्न झाला. इंग्रजांनी या वाड्यात मेंटल हॉस्पिटल उभारले.


या कार्यक्रमात ख्यातनाम लेखक आणि माजी सनदी अधिकारी श्री​. ​ज्ञानेश्वर मुळे, पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त श्री.संदीप कर्णिक श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

बीव्हीजी इंडिया लि., क्लब हेरिटेज पुणे आणि एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा हेरिटेज वॉक होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स हा या उपक्रमाचा मिडिया पार्टनर आहे.

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page