top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 20
09-07-2023

वेदशास्त्रोत्तेजक  सभा

मार्गदर्शन : सौ श्रद्धा परांजपे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वेदशास्त्रोत्तेजक सभा, २०४६ सदाशिव पेठ,सणस मैदाना जवळ, पुणे या वास्तूत येत्या रविवारी ९ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय विद्यांची अध्ययन परंपरा जतन व्हावी यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात ३१ ऑगस्ट १८७५ रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभेची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी तत्कालीन वैदिक, शास्त्री, पंडित व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली होती.

वेदोत्तेजक संस्थेतर्फे वेदाध्ययनास व न्याय, मीमांसा, वेदान्त, व्याकरण, साहित्यशास्त्र, काव्य इत्यादींच्या अभ्यासास उत्तेजन देण्यासाठी परीक्षाही घेण्यात येते. वेद पठणानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिज्ञ, कोविद, चूडामणी या अनुक्रमे बारावी, बी.ए., एम.ए.च्या समकक्ष पदव्या देण्यात येतात. कर्मकांडावर मौखिक सोबतच प्रात्यक्षिक परीक्षा असते.ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदांचे अध्ययन करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रसंपन्‍न ही पदवी मिळते.


वेदशास्त्रोत्तेजक  सभा गुगल लोकेशन 
https://goo.gl/maps/q24b5RDqVvtKXBwdA

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page