top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 51
10-02-2023

भारतातील पहिले तारांगण

मार्गदर्शक : श्री. विनायक रामदासी

10 फेब्रुवारी 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील भारतातील पहिल्या तारांगणात सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळात हेरिटेज वॉकचेआयोजन करण्यात आले आहे. तारांगणचे प्रमुख श्री विनायक रामदासी याप्रसंगी माहिती देणार आहेत.


हे तारांगण 1954 मध्ये सुरू झाले .या तारांगणातील यंत्राचे डिझाईन ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केले आहे . ते अमेरिकेतील spitz  या कंपनीने तयार केलेले मशीन आहे . या कंपनीचे जगात चालू असलेले हे एकमेव मशीन आहे . या तारांगणात बसून आपण कोणत्याही दिवसाचे, ,ठिकाणांचे, वेळेचे आकाश बघू शकतो. 18 सप्टेंबर 1954 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर गिरीजाशंकर बाजपेयी यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन झाले .सध्या भारतात पन्नास डिजिटल तारांगणे आहेत . या तारांगणा मधून डिजिटल रेकॉर्ड माहिती दिली जाते . परंतु न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील तारांगणामध्ये डिजिटल रेकॉर्ड माहिती न देता जिवंत अनुभव देण्यात येतो . यावेळी तारका समूह, राशी, आकाशातील विविध ठिकाणे, विविध संस्कृतीमधील आकाशगंगे विषय दंतकथा आणि माहिती सांगण्यात येणार आहे . ताऱ्यांमधील अंतर शोधण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे .सभागृहात एकाच वेळी फक्त 80 लोकांनाच प्रवेश देण्यात येतो . हा कार्यक्रम सशुल्क आहे.

 


तारांगण सूचना
1) दिलेल्या नियोजित वेळेलाच तारांगणाचा शो सुरु होईल.
2) उशीरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
3) शो सुरु असताना मोबाईल पूर्ण बंद ठेवणे आवश्यक आहे.
4) शो सुरु असताना खाद्य पदार्थ खाऊ नयेत.

तारांगण पाचव्या मजल्यावर आहे. लिफ्ट नाही

भारतातील पहिले तारांगन :

गुगल लोकेशन https://g.co/kgs/oaDRXXG

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page