top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 31
21-09-2023

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भवन

मार्गदर्शन : आर्किटेक्ट अर्चना देशमुख व श्री संजीव जावळे 

पुण्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून या वेळेसचा वॉक श्रीमत भाऊसाहेब रंगारी गणपती भवन येथे आयोजित केला आहे.

 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असुन, लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते. 

 

आर्किटेक्ट अर्चना देशमुख यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भवन या वास्तूचं उत्तम जतन आणि संवर्धनाचे काम केलेले आहे. या कामाचा त्यांना गेली बारा वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथे त्यांनी हेरिटेज संवर्धनाची कामे केलेली आहेत. याप्रसंगी तीन मजली वास्तू, शस्त्रास्त्रे, भुयारी मार्ग, रथ, भाऊ रंगारी यांचे कार्य यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

 

याप्रसंगी मंडळाचे उत्सव प्रमुख श्री. पुनीत बालन आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भवन- गुगल लोकेशन 

https://maps.app.goo.gl/C4NcbcvvoG2cDHnk6

bottom of page