top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 22
16-07-2023

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर

मार्गदर्शन : प्रा मोहन शेटे सर

दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता प्रा. मोहन शेटे सर नृसिंह मंदिराच्या हेरिटेजचे दर्शन घडविणार आहेत. खजिना विहिरीजवळील विद्यार्थीगृहा समोरील नृसिंह मंदिर आणि समोरील बखळ (आजचे स्काऊट मैदान) ही ख्यातनाम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वास्तव्याने ख्यातकीर्त झालेली वास्तू होय. येथे ते शस्त्रास्त्रे चालविण्याचे वर्ग भरवत असत. येथे शारीरिक व्यायाम, कसरती, दांडपट्ट्याचे हात, तलवार, भाला चालविण्याचे प्रयोग स्वतः फडके गुप्तपणे देशभक्त युवकांना शिकवीत असत.

फडके यांचे दीर्घकाळ वास्तव्य पुण्यात होते. त्यातही नृसिंह मंदिराला त्यांच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला नरसिंह येथेच घडला. येथेच फडके यांनी स्वदेशी वापर, स्वदेशी उद्योग व्यवसाय व्रत घेऊन त्याचा प्रसार केला. त्यांनी इंग्रजाकडील नोकरीचा त्याग करून आयुष्य देशसेवेला वाहून घेतले. याचा साक्षीदार म्हणजे हे मंदिर आहे.

 

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर गुगल लोकेशन 

https://goo.gl/maps/Te6gA7KEpedbBXYL9

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page