top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 47
14-01-2023

पानिपतची लढाई - राष्ट्ररक्षक मराठे आणि अब्दाली

मार्गदर्शक : श्री. योगेश फाटक

१४ जानेवारी म्हणजे पानिपतच्या लढाईचा दिवस. या दिनाचे कृतज्ञ स्मरण करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षक मराठ्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्यासाठी पर्वती येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राष्ट्ररक्षक मराठे आणि अब्दाली’ या विषयावर सकाळी ९ वाजता लेखक-अनुवादक योगेश फाटक यांचे व्याख्यान होणार आहे.


१७६१ ची पानिपतची लढाई ही जगातील गाजलेल्या लढायांपैकी एक आहे. शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने मराठे पानिपतावर गेले. त्यांचा सामना अफगाणिस्तानचा प्रमुख शासक अब्दालीशी झाला. अब्दालीने भारतावर आठ स्वाऱ्या केल्या होत्या. अब्दालीचे इंग्रजी भाषेतील चरित्र ‘गंडासिंह’ यांनी लिहिले आहे. त्याचा अनुवाद योगेश फाटक यांनी केला आहे. फाटक हे इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत. श्री शिवदुर्ग संवर्धन या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य असून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनाचे काम चालते. फाटक हे मोडी लिपीचे जाणकार आहेत. याप्रसंगी पर्वती वरील संग्रहालयात देसाई महाविद्यालयाच्या हेरिटेज सेंटरचे संचालक प्रा. डॉ. गणेश राऊत


माहिती देणार आहेत. देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने नानासाहेब पेशवे यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

 

देवदेवेश्वर संस्थान, पर्वती  : गुगल लोकेशन 

https://maps.app.goo.gl/E7v9ydjHjXgkPQ8A9

bottom of page