top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 38
11-11-2023

पुणे : दुर्मिळ कृष्णधवल फोटोग्राफ्स

मार्गदर्शक : श्री. मंदार लवाटे

शंभर वर्षांपूर्वीच्या पुण्याचे दुर्मिळ कृष्णधवल फोटोग्राफ्स स्लाईड शोच्या माध्यमातून आणि त्यावरचे भाष्य ऐकण्याची संधी हेरिटेज वॉक मध्ये मिळणार आहे. पुण्याच्या अभ्यासक, मोडी कागदपत्रांचे जाणकार आणि कृष्णधवल फोटोंचे संग्रह श्री. मंदार लवाटे हे शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी हेरिटेज वॉक मध्ये जुन्या पुण्याचे दर्शन घडविणार आहेत. एच. व्हि.देसाई महाविद्यालयात हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे.

बीव्हीजी इंडिया लिमिटेड, क्लब हेरिटेज आणि एच.व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे .महाराष्ट्र टाइम्स हा या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन आणि उद्योजक श्री राजेशभाई शाह यांच्या हस्ते हेरिटेज वॉक मध्ये सहभागी झालेल्या वक्त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे . प्राचार्य, डॉ. राजेंद्र गुरव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. मंडळाचे सहसचिव श्री दिलीप जगड याप्रसंगी उपस्थित असणार आहेत .दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे शेवटी चहापान समारंभ होणार आहे.

एच. व्हि. देसाई महाविद्यालय : गुगल लोकेशन 
https://maps.app.goo.gl/NraQwxHHFr2tP2Yq7

bottom of page