top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 40
26-11-2023

महात्मा फुले वाडा

मार्गदर्शक : प्रा. दिलीप चव्हाण

समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात ज्यांचे अनमोल योगदान आहे, असे थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३३ व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुलेंचे निवासस्थान असलेल्या फुले वाडा, गंज पेठ येथे रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९:३० वाजता हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. प्रा. दिलीप चव्हाण हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याची तसेच फुले वाड्याच्या इतिहासाची माहिती देणार आहेत. डॉ. विलास वहाणे (असि. डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी, पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

१८५२ मध्ये बांधलेल्या या वाड्याला १९७२ मध्ये राज्य-संरक्षित  वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीराव  आणि सावित्रीबाई फुले यांना समर्पित स्मारकात या वाड्याचे रूपांतर करण्यात आले आहे. तसेच वाड्यात महात्मा फुलेंशी संबधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह  असलेले संग्रहालय आहे.

 


महात्मा फुले वाडा: गुगल लोकेशन 

https://maps.app.goo.gl/5STBH1hdprDXQFQ27

bottom of page