top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 30
17-09-2023

श्री छत्रपती शिवाजी पूल

मार्गदर्शन : डॉ. सचिन जोशी, श्री. सुनील जोशी व प्रा. रेश्मा माने

छत्रपती शिवाजी पुलाच्या उद्घाटन समारंभास १७ सप्टेंबर २०२३ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पुलाचे उद्घाटन सर जॉर्ज लॉईड, राज्यपाल, मुंबई इलाखा यांच्या हस्ते झाले. या पुलाचा नकाशा लेफटनंट कर्नल ई. एस. प्राईस, चीफ इंजिनिअर आणि सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तयार केला होता. या पुलाच्या बांधकामास जानेवारी १९२० मध्ये सुरुवात करण्यात आली. पुढे तीन वर्षे या बांधकामास लागले. याप्रसंगी प्राध्यापक डॉ. सचिन जोशी सहभागी असणाऱ्यांना पुलाचे बांधकाम, पुलाचा इतिहास याची माहिती देणार आहेत. डॉक्टर जोशी यांचे उच्च शिक्षण पुरातत्त्व शास्त्रात झाले आहे. पुरातत्त्व उत्खननात मिळालेल्या जीवाश्माचे कालमापन ते करतात. उत्खननातील काचेच्या वस्तू, माती, खापरे, हस्तीदंत ,प्राण्यांची हाडे यांचे रासायनिक पद्धतीने ते संशोधन करतात .त्यांचे चाळीस संशोधन पर शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झालेले आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ले हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

 

या प्रसंगी श्री .सुनील जोशी (पर्यावरण आणि जल अभ्यासक,पत्रकारितेच्या माध्यमातून पाणी याविषयावर काम,जल बिरादरी,नदी पुनर्जीवन कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यात) व प्रा. रेश्मा माने (पर्यावरण अभ्यासक, कार्यकारी संपादक पर्यावरण संस्कृती मासिक, युगंधर फाऊंडेशन सोलापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. 

 

श्री छत्रपती शिवाजी पूल जमण्याचे ठिकाण - शनिवारवाडा गुगल लोकेशन 

https://goo.gl/maps/jCaEeW3F8X9deCtXA

bottom of page