top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 52
श्री शिवजयंती 
19-02-2023 

राजगडाचे त्रिमितीय दर्शन

मार्गदर्शक : श्री. गणेश धालपे व  प्रा. डॉ. गणेश राऊत

राजगडाचे त्रिमितीय दर्शन 3D घडविणारे पहिलेच फिरते प्रेक्षागृह अनुभवण्याची संधी हेरिटेज वॉक मध्ये मिळणार आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता  देसाई महाविद्यालयात  हा कार्यक्रम होणार आहे .


याप्रसंगी शिवचरित्राचचे अभ्यासक श्री गणेश धालपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारथी संस्थेचे चेअरमन श्री अजित निंबाळकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून सारथीचे व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे हे असणार आहेत. या प्रसंगी हेरिटेज सेंटर चे संचालक प्रा .डॉ . गणेश राऊत यांचे शिवकार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमांचकारी इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या गडकोटांचे दर्शन सर्व अबालवृद्धांना घडविण्यासाठी 'इतिहास चक्र' मार्फत पहिल्याच फिरत्या त्रिमितीय प्रेक्षागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमांचकारी इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या गडकोटांचे दर्शन घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्ञानरंजनासाठी कल्पकतेने प्रभावी वापर करून श्री. गणेश धालपे यांच्या संकल्पनेतून  त्रिमितीय दर्शन घडविणाऱी देशातील पहिलीच फिरत्या स्वरुपातील त्रिमितीय यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याचा प्रारंभ स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या  'गडांचा राजा... राजांचा गड - राजगड' या त्रिमितीय माहितीपटाने झालेला आहे. इतिहास अभ्यासक श्री. गणेश धालपे यांची संकल्पना व लेखन, 'इतिहास चक्र' ची निर्मिती आणि 'आनंदयात्रा पर्यटन'ची प्रस्तुती असलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड  किल्ल्याचा त्रिमितीय माहितीपट पहाताना प्रेक्षक बसल्या जागेवरून ऐतिहासिक माहितीसह संपूर्ण राजगड फिरल्याचा आभासी आनंद घेतील. किल्ले राजगडाच्या पद्मावती, सुवेळा व संजीवनी या तीन माच्या आणि बालेकिल्ला, तसेच गडावरील पाण्याचे तलाव, दरवाजे, मंदिरे, गडवाटा, वाडे, डोंगरदऱ्या यांची माहितीसह मनोहारी अनुभूती देणारा हा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून निर्माण केलेला हा प्रयोग म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती देणारी अनुभूतीसंपन्न सर्वांगसुंदर आनंदयात्रा असणार आहे. सिल्व्हर स्क्रीनवर दाखवला जाणारा हा माहितीपट विशेष प्रकारचे गाॅगल घालून अनुभवता येणार आहे. अनेकदा जाऊनही न दिसलेले राजगडाचे विहंगम दर्शन यातून घडेल.या कार्यक्रमासाठी एच . व्ही . देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख श्री निरव सुरतवाला यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

सूचना= फक्त 170 लोकांना सहभाग घेता येईल तरी त्यासाठी सर्वांनी कॉल करून आपले नाव नोंदणी करावी. कार्यक्रमाचे शुल्क 50 रुपये आहे.

सूचना
1) दिलेल्या नियोजित वेळेलाच  शो सुरु होईल.
2) उशीरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
3) शो सुरु असताना मोबाईल पूर्ण बंद ठेवणे आवश्यक आहे.
4) शो सुरु असताना खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
5) पार्किंगची सोय नाही प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर पार्किंग करावी


देसाई महाविद्यालय : गुगल लोकेशन
https://maps.app.goo.gl/JRccQTwsh7MGT5598

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page