
गो से गोमाता
भारतातील देशी भाकड गाई जनसहभागातून प्रजननक्षम बनविण्याचा उपक्रम !
जय गोमाता
"देशी गोवंश प्रजननक्षमता वृ द्धी अभियान"
द्या भाकड गाईस, मातृत्वाची अनुभूती !
देशी गोवंशाच्या गाईंची दूध उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे दूध उत्पादकांचा कल जर्सी गाईंचे संगोपन करण्याकडे असतो, हि वस्तुस्थिती आहे. त्यातच जर एखादी देशी गोवंशाची गाय काही कारणांमुळे "भाकड" राहत असेल तर देशी गोवंश आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आपल्या देशातील गोवंश हा लोप पावत चाललेला आहे. निकृष्ठ दर्जाचा पशुआहार व सदोष पशुपालनामुळे देशी गाई भाकड बनण्याचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोचले आहे. शेतकऱ्याला अशा गाई पोसण्यासाठी रोज किमान दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो, म्हणजे महिना अंदाजे पाच हजार, वर्षाकाठी 60 हजार रुपये खर्च, एका गाईसाठी येतो. शेतकऱ्याला दुधापासून होणारा फायदा बराचसा भाकड गायी पोसण्यातच खर्च होतो.
BVG AgroTech Pvt Ltd पुणे या कंपनीचे संचालक तसेच तज्ज्ञ सल्लागार शास्त्रज्ञ डॉ प्रशांत पाटील साहेबांनी गेल्या दोन दशकाहून अधिक काळ औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यांवर विपुल संशोधन केले असून त्यांच्या संशोधित पशुखाद्यपुरकास ५ भारतीय व ४ अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहेत. डॉ पाटील यांच्या संशोधित पशुखाद्य पुरकामुळे भाकड गाई-म्हशी विशेषतः देशी वंशाच्या गाई प्रजननक्षम बनविण्यासाठी पशुखाद्यपुरकाची निर्मिती Herbotics Biosciences कडून केली जात आहे. १०० तील ७० % भाकड गाई-म्हशी दुभत्या करता येतील इतके प्रभावी हे औषध आहे. आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त गाई - म्हशीं वर यशस्वी प्रयोग केला आहे.
सदर देशी गोवंश रक्षण, प्रजनन वृद्धी उपक्रमास सहकार्य करा, भाकड गाईंना पांजरपोळात जाण्यापासून वाचवा व पुण्य मिळवा !
(या उपक्रमातून जर्सी गाई व म्हशींना औषध दिले जाणार नाही)



