top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 48
20-01-2023

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

मार्गदर्शक : डॉ. अ. श्री. चाफेकर

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, रा .गो. भांडारकर,  ह ..ना. आपटे यांनी 1894 मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे मूळ नाव डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी असे होते.१८९४ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक काकांच्या जोशी महल या सभागृहात या संस्थेची स्थापना झाली. संस्थेने 1825 ते 1925 या शंभर वर्षाच्या कालखंडातील मराठी ग्रंथांची सूची तयार केली आहे. संस्थेकडे सहा हजार ग्रंथ असून त्यातील काही ग्रंथ हे शंभर वर्षांपेक्षा अत्यंत जुने आणि दुर्मिळ आहेत. याचा उपयोग भारतभरातील विद्यार्थी संशोधनासाठी करत आहेत. संस्थेने मराठी ग्रंथरचनेची वाटचाल, पेशवेकालीन समाज आणि प्रशासन, अशा प्रकारचे ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. याप्रसंगी संस्थेचे सहकार्यवाह  अँड. डॉ. अ. श्री. चाफेकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. 


महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे: गुगल लोकेशन

https://maps.app.goo.gl/zk6hEQ1LfPKnXumg9

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page