top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 34
16-10-2023

कसबा गणपती

मार्गदर्शक : प्रा. चैतन्य साठे

१६ ऑक्टोबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत  कसबा गणपती येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. 'भारतविद्या' या विषयाचे अभ्यासक प्रा. चैतन्य साठे या प्रसंगी माहिती देणार आहेत.

 

कसबा गणपती पुण्याचा मानबिंदू आहे. मध्ययुगातील एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार म्हणजे कसबा गणपती होय. मातोश्री जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रद्धास्थान म्हणजे कसबा गणपती होय.

कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुणेला गणपतीच शहर म्हंटल जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात. १८व्या शतकानंतर पेठेची विशेष वाढ झाली. कस्ब या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला. (Source: Wikipedia)

या प्रसंगी सकाळी १० वाजता 'भारतीय उपखंडातील गणपती उपासनेचा सांस्कृतिक इतिहास' या विषयावरील एक स्लाईड शो एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या शांताबेन सभागृहात दाखवण्यात येणार आहे. स्लाईड शो संपल्यानंतर चालत चालत कसबा गणपती येथे जमायचे आहे. अधिक माहितीसाठी श्री. उमेश पोटे (९७६२०९२३३२) यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

 

एच. व्ही. देसाई महाविद्याल- एकत्र जमण्याचे ठिकाण : गुगल लोकेशन 

 

https://maps.app.goo.gl/JRccQTwsh7MGT5598

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page