top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 35
22-10-2023

शिवसृष्टी

मार्गदर्शक : शिवअभ्यासक डॉ. अजित आपटे

२२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता *शिवसृष्टी, आंबेगाव बुद्रुक* येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. 

 

या हेरिटेज वॉकमध्ये शिवछत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे दालन दाखवण्यात येणार आहे. यात तलवार, भाला, चिलखत, दांडपट्टा, वाघनखे, कट्यार, तोफ, बंदुकी, बाण पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू असणाऱ्या बादशहा आणि सरदारांची ऐतिहासिक चित्रे पाहायला मिळणार आहेत. राज्याभिषेक सोहळा, आग्रा येथून सुटका, रायगड सफर, किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागींना बघायला मिळणार आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जणू आपल्याशी संवाद करीत आहेत, असाही भास येथे एका दालनात करण्यात आलेला आहे.

या हेरिटेज वॉकमध्ये शिवअभ्यासक डॉ. अजित आपटे, प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी मा. अनिल पवार आणि प्रा. डॉ. गणेश राऊत उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नेहमी २५० रुपये शुल्क असते. प्रतिष्ठानने या कार्यक्रमासाठी प्रत्येकी १०० रुपये सवलत दिलेली आहे. यामुळे प्रत्येकी १५० रुपये तिकीट असणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. उमेश पोटे (९७६२०९२३३२) यांच्याशी संपर्क साधावा किंवा महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान, शिवसृष्टी, सर्व्हे क्र. १३, आंबेगाव (बु.), कात्रज, बाह्यवळण रस्ता, ता. हवेली, जि. पुणे - ४६, दूरध्वनी (९५७९६२२४५६ / ७८२०९२३७३७) यांच्याशी संपर्क साधावा. 

 

 

शिवसृष्टी : गुगल लोकेशन 

 

https://maps.app.goo.gl/TxoANMnKaAjSbP5S6

Website

https://www.shivsrushtipune.com/

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page