top of page
बीव्हीजी हेरिटेज वॉक - 9
16-04-2023
त्रिशुंड गणपती
मार्गदर्शन : श्री. प्र. के. घाणेकर सर
श्री त्रिशुंड गणपतीचे देऊळ सोमवार पेठेत आहे. ते स्वयंभू गणपतीचे मंदिर म्हणून मानले जाते. ते देऊळ महाकाळ रामेश्वराचे आहे अशीही समजूत आहे .इसवी सन 1754 ते 1770 या काळात बांधले गेले असावे असे शहर पुणे या ग्रंथात म्हटलेले आहे. त्रिशुंड गणपतीचे मंदिर गोसावी मंडळींनी बांधविले. शिखराच्या पायथ्यापर्यंतचा म्हणजे भिंतीचा भाग बांधीव आहे. तो सजविलेला आहे .मंडपावरील घुमट आणि गाभाऱ्यावरील शिखर वेगळ्याच पद्धतीची आहेत. समोरच्या दर्शनी भागावर मूर्ती कोरलेल्या आहेत. किचक रुपी हस्त आहेत. यक्ष अप्सरा कोरलेल्या आहेत. अशा प्रकारचे मूर्तिकाम असणारे हे पुण्यातील एकमेव मंदिर आहे .
श्री त्रिशुंड गणपतीचे गुगल लोकेशन :
https://goo.gl/maps/5CNtNW2mgzZrLGkb6
























