top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 50
03-02-2023

ऑल सेंट्स चर्च - खडकी

मार्गदर्शक : धर्मगुरू रेव्हरंड मनोज काटे

खडकी येथील 'ऑल सेंट्स चर्च' चा इतिहास, आकर्षक स्थापत्यशैली आणि सुरुवातीच्या काळापासून असलेली वैशिष्ट्ये यांची माहिती घेण्याची संधी हेरिटेज वॉकच्या निमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. येत्या शनिवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता हा हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे.

 

 

मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी स्थित या चर्चची माहिती उपस्थितांना चर्चच्या व्यवस्थापन समितीचे विश्वस्त श्री. नॉर्मन लॅफ्रे, सचिव श्री. नरसिंहन, मुख्य धर्मगुरू रेव्हरंड मनोज काटे हे देणार आहेत.

 


चर्चचा पावणेदोनशे पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास, चर्चच्या वाटचालीतील महत्वाच्या घटना, परंपरा, साजरे होणारे सणसमारंभ, जपून ठेवलेले ऐतिहासिक दप्तर, चर्चमध्ये केली जाणारी विविध सामाजिक कार्ये, चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्था इत्यादींची माहिती उपस्थितांना दिली जाईल. चर्चचे वैशिष्ट्यपूर्ण बाह्य आणि अंतर्गत स्थापत्य, स्थापनाकाळाचा इतिहास याची माहिती श्री. भूषण तळवलकर देतील. इच्छुकांनी सकाळी सव्वानऊ वाजता मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या चर्चच्या छोट्या प्रवेशद्वाराने आत येऊन चर्चच्या प्रांगणात जमावे. 

 

 

ऑल सेंट्स चर्च - खडकी  : गुगल लोकेशन 

 

https://maps.app.goo.gl/wsBWoNkSjUKcJuxo7

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png

परियोजनाओं

जोड़ना

प्रधान कार्यालय

+9186250 12233 

bvggroup.biz@gmail.com

बिव्हीजी इंडिया लिमिटेड

चौथी मंजिल, मिडास टॉवर, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवाड़ी, फेज 1, पुणे - 411057

© 2023 बिव्हीजी बिज़ टीम द्वारा। 

  • WhatsApp
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
bottom of page