top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 44
23-12-2023

नॅशनल वॉर मेमोरियल - सदर्न कमांड

मार्गदर्शक : कर्नल अवधूत ढमढेरे (नि) आणि श्री नितीन शास्त्री 

गोवा मुक्ती संग्रामाची स्मृती जागविणारे ‘नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड’हे मेमोरियल संपूर्ण दक्षिण आशियातील पहिले युद्ध स्मारक आहे की जे सामान्य लोकांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. या युद्ध स्मारकाचे दोन भाग आहेत. भारतीय स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत जेवढी युद्धे झाली त्या युद्धांचा इतिहास दाखविणारे चित्रफलक आणि दुसरा भाग म्हणजे सदर्न कमांड म्युझियम. आपल्या सशस्त्र दलांनी जी साहसी कामगिरी केलेली आहे तिची स्मृती जागविण्यासाठी युद्ध नौकांच्या प्रतिकृती, विजयंता रणगाडा आणि मिग - २३ या विमानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 1947 पासून सशस्त्र सेना दलांचा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या परमवीर चक्र पदक विजेत्या 21 वीरांचे पुतळे आपल्याला येथे बघता येतात. त्याशिवाय 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त करताना जो संग्राम झाला त्याची काही छायाचित्रे आपल्याला येथे बघता येतात.


1962, 1966, 1971 आणि 1999 या युद्धात झालेल्या काही संस्मरणीय लढाया आपल्याला येथे चित्ररूपात बघता येतात. सदर्न कमांड वस्तू संग्रहालयात आपल्याला सैन्य दलाच्या वापरात असलेले विविध प्रकारचे युद्ध साहित्य जसे भूसुरुंग, रणगाडा भेदी सुरुंग, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा, विविध प्रकारचे रणगाडे आणि चिलखती गाड्या आपल्याला या ठिकाणी बघता येतील. भारतीय सशस्त्र दलांचा आतापर्यंतचा चित्ररूप इतिहास आपल्याला येथे बघता येईल. भारतीय सैनिकांची पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील कामगिरी, श्रीलंकेतील शांती सेना, कांगो येथील शांती सेना यामध्ये जी कामगिरी केली त्याची छायाचित्रे येथे बघता येतात. भारतात असलेल्या सर्व युद्ध स्मारकांचे माहिती फोटो आणि अनेक वीरांबद्दलची माहिती आपल्याला येथे सहजपणे घेता येते.

 

हा हेरिटेज वॉक सशुल्क असून युद्ध स्मारकाचे प्रवेश मूल्य २० रुपये आहे. 

नॅशनल वॉर मेमोरियल : गुगल लोकेशन 

https://maps.app.goo.gl/ySqgbq9Etc2yaRpu8

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png

परियोजनाओं

जोड़ना

प्रधान कार्यालय

+9186250 12233 

bvggroup.biz@gmail.com

बिव्हीजी इंडिया लिमिटेड

चौथी मंजिल, मिडास टॉवर, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवाड़ी, फेज 1, पुणे - 411057

© 2023 बिव्हीजी बिज़ टीम द्वारा। 

  • WhatsApp
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
bottom of page