top of page
बीव्हीजी हेरिटेज वॉक - 14
21-05-2023
कमला नेहरू पार्क
मार्गदर्शन : प्रा शाम भुर्के सर
कमला नेहरू पार्क मध्ये सुमारे 300 पेक्षा जास्त झाडे आणि वनस्पती आहेत. यात औषधी वनस्पतींचा प्रामुख्याने समावेश आहे. भारत-पाक युद्धातील एक विमान येथे ठेवण्यात आले आहे. 2005 सालापासून ज्ञानकोशकार केतकर यांची स्मृती या उद्यानात जागवली जाते .या कामी प्राचार्य शाम भुर्के यांनीच पुढाकार घेतला होता .त्यांच्या पुढाकाराने गेली 18 वर्षे हा कार्यक्रम उद्यानात चालू आहे. ज्ञानकोशकार केतकर यांची समाधी याच उद्यानात आहे. याच उद्यानात पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सौजन्याने मासिक साहित्य कट्टा चालविला जातो. याच उद्यानात पूर्वी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेचे विद्यार्थी चित्रीकरण करण्यासाठी येत असत.
कमला नेहरू पार्क गुगल लोकेशन
https://goo.gl/maps/J9yTnUQY3nKk3PkY7
























