top of page
GRAMDOOT.png
Anchor Gramdoot

"ग्रामदूत"

आपल्याकडील ज्ञानाचा, वेळेचा, संपर्काचा व कौशल्याचा खुबीने वापर करून, मोकळ्या वेळेत जो अतिरिक्त पैसे कमवू इच्छितो, तो व्यक्ती म्हणजेच "ग्रामदूत" - Village Ambassador (VA)

​BVG Group भारत देशातील एकात्मिक सेवा पुरवणारी सर्वांत मोठी कंपनी असून ८०,०००​ पेक्षा जास्त कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये सुरु झालेला BVG Group सध्या कृषी, आरोग्य, अन्नपदार्थ, कौशल्य रोजगार क्षेत्रामध्ये विस्तारित होत आहे. 

मा. हणमंतराव गायकवाड साहेबांचे स्वप्न असणाऱ्या १० लाख तरुणांना रोजगार देण्याच्या ध्येयपूर्तीसाठी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक युवा ग्राम दूत नेमण्याचे ठरविले असून, या नावीन्यपूर्ण योजनेत आपण सामिल व्हावे. 

ग्रामदूत (Village Ambassador) असे या योजनेचे नाव असून यामध्ये आपण BVG कंपनी सोबत संलग्न व्यवसाय करु शकतां. यामध्ये आपण स्थित असणाऱ्या गावांमधील कृषी​,सामाजिक, राजकीय, ग्रामपंचायत, प्रशासन, शासकीय, आरोग्य, कौशल्य, युवक, रोजगार, स्वयंरोजगार​ ​विषयक​ तसेच गावातील ​इतर गोष्टींविषयी माहिती देवून​-घेऊन अर्थार्जन करू शकता. (ही नोकरी नाही, हे नक्की लक्षात असू द्यात !)

या योजनेत सहभागी होण्यासाठी ​आपणाला ​कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

 

​प्रत्येक गावातून प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. निवडीचा अधिकार BVG कडे राखीव असेल. 

ग्रामदूतची भूमिका 

प्रचलित अर्थाने ग्रामदूत खालील पैकी कुठलीही भूमिका निभावतो.  

  1. Lead Generator 

  2. Representative 

  3. Freelancer 

  4. Short Term Contractor 

  5. Part-time/Full-time work

  6. Business Opportunity Provider

ग्रामदूतचे कार्य 

आपल्या गावातील/परिसरातील/तालुक्यातील व्यक्ती वा संस्था यांच्याशी संपर्क करून देणे, Lead निर्माण करणे, व्यवसाय करणे, डिलिव्हरी देणे-घेणे, उद्योजकतेस प्रोत्साहन देणे, नोकरी-व्यवसाय मिळवून देण्यात मदत करणे इ कामे करणे.   

ग्रामदूतचे उत्पन्न 

आपल्याला पुढील ३ पद्धतीने पैसे मिळतील 

 

  1. मागणीप्रमाणे डेटाबेस, संपर्क, ओळख करून दिल्यावर एकरकमी एकदाच (Onetime)

  2. संपर्क करून दिल्यावर पार्टीशी झालेल्या व्यवहारावर एकरकमी एकदाच (Onetime)

  3. संपर्क करून दिल्यावर पार्टीशी होत असलेल्या सततच्या व्यवहारांवर कायम, प्रत्येक ट्रान्सक्शनवर (Recurring) 

ग्रामदूत बँक ट्रान्सफर 

आपल्याला प्रत्येक काम सांगताना स्पष्ट केले जाईल कि आपल्याला वरील ३ पैकी कुठल्या पद्धतीने पैसे दिले जातील. आपल्याला ती पद्धत आवड्ल्यासच आपण काम करायचे, नाहीतर सरळ नाही म्हणायचे, आम्ही ज्याला आमचे दर पटतील अशाला काम देऊ.

 

आपल्याला आपले मानधन आपल्या बँक खात्यात दिले जाईल. यासाठी आपल्याकडे GPay, PhonePay, Amazon Pay, UPI ID आवश्यक आहे. 

GO SE GOMATA.png
Anchor go se gomata

गो से गोमाता 

भारतातील  देशी भाकड गाई जनसहभागातून प्रजननक्षम बनविण्याचा उपक्रम !
 
जय गोमाता
 
"देशी गोवंश प्रजननक्षमता वृद्धी अभियान"
 
द्या भाकड गाईस, मातृत्वाची अनुभूती !

देशी गोवंशाच्या गाईंची दूध उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे दूध उत्पादकांचा कल जर्सी गाईंचे संगोपन करण्याकडे असतो, हि वस्तुस्थिती आहे. त्यातच जर एखादी देशी गोवंशाची गाय काही कारणांमुळे "भाकड" राहत असेल तर देशी गोवंश आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आपल्या देशातील गोवंश हा लोप पावत चाललेला आहे. निकृष्ठ दर्जाचा पशुआहार व सदोष पशुपालनामुळे देशी गाई भाकड बनण्याचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. शेतकऱ्याला अशा गाई पोसण्यासाठी रोज किमान दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो, म्हणजे महिना अंदाजे पाच हजार, वर्षाकाठी 60 हजार रुपये खर्च, एका गाईसाठी येतो. शेतकऱ्याला दुधापासून होणारा फायदा बराचसा भाकड गायी पोसण्यात खर्च होतो.

 

BVG AgroTech Pvt Ltd पुणे या कंपनीचे संचालक तसेच तज्ज्ञ सल्लागार शास्त्रज्ञ डॉ प्रशांत पाटील साहेबांनी गेल्या दोन दशकाहून अधिक काळ औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यांवर विपुल संशोधन केले असून त्यांच्या संशोधित पशुखाद्यपुरकास ५ भारतीय व ४ अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहेत. डॉ पाटील यांच्या संशोधित पशुखाद्य पुरकामुळे भाकड गाई-म्हशी विशेषतः देशी वंशाच्या गाई प्रजननक्षम बनविण्यासाठी पशुखाद्यपुरकाची निर्मिती Herbotics Biosciences कडून केली जात आहे. १०० तील ७० % भाकड गाई-म्हशी दुभत्या करता येतील इतके प्रभावी हे औषध आहे. आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त गाई - म्हशीं वर यशस्वी प्रयोग केला आहे. 

 

महाराष्ट्रातील देशी भाकड गाईंना हे पेटंटेड पशुखाद्यपुरक देऊन त्यांना दुभत्या बनविण्यासाठी आम्ही आपल्याकडून एका गाईसाठी रु १५०० चे योगदान अपेक्षित करतो आहोत. यात एका गाईची 1 महिन्याची पशुखाद्यपुरके (Rajjo, Vardaan, Dhara & All Clear Tablets) व शेतकऱ्याला पशु वैद्यकीय सल्ला अंतर्भूत आहे. यात शेतकऱ्यापर्यंत पोच देण्यासाठीचा कुरियर खर्च अंतर्भूत आहे. देणगीदाराला गाईचा व शेतकऱ्याचा फोटो, संपूर्ण माहिती, प्रजनन झाल्यास गाय-वासराचा फोटो व शेतकऱ्याची प्रतिक्रिया WhatsApp द्वारे जोडून दिली जाईल.

 

सदर देशी गोवंश रक्षण, प्रजनन वृद्धी उपक्रमास सहकार्य करा, भाकड गाईंना पांजरपोळात जाण्यापासून वाचवा व पुण्य मिळवा !

 

 

(या उपक्रमातून जर्सी गाई व म्हशींना औषध दिले जाणार नाही)

महाराष्ट्रात कुठेही कुरियर खर्चासहीत रु. 1500/- योगदान. महाराष्ट्राबाहेर देशभरात कुठेही कुरियर खर्चासहीत रु. 1800/- योगदान 

Contribution anywhere in Maharashtra : Rs 1500/- Outside Maharashtra : Rs 1800/- (Courier Charges Inclusive)

 

सहयोगी संस्था : HITCON, पुणे व वसुंधरा संस्था, नाशिक 

Processing & Delivery Partner: VERA VENTURES Pvt Ltd, Pune.

Come Work With Us

Thank you! We’ll be in touch.

गो से गोमाता प्रकल्पात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा 

bottom of page